Pune Crime esakal
पुणे

Pune Crime : कुऱ्हाडीचा धाक दाखवून दारुच्या दुकानात राडा, ग्राहकांना मारहाण

पुण्यातील ग्रामीण भागातही राजरोसपणे कोयते फिरवले जात आहेत. नांदेड फाटा या ठिकाणी असणाऱ्या एका दारूच्या दुकानात तीन जणांनी कोयता, कुऱ्हाड दाखवत राडा घातला.

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत अजून कमी झालेली नाही. पुण्याप्रमाणे ग्रामीण भागातही हेच लोण पसरत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून निर्दोष नागरिकांनाही विनाकारण लक्ष्य केलं जात आहे.

पुण्यातील ग्रामीण भागातही राजरोसपणे कोयते फिरवले जात आहेत. नांदेड फाटा या ठिकाणी असणाऱ्या एका दारूच्या दुकानात तीन जणांनी कोयता, कुऱ्हाड दाखवत राडा घातला. हल्लेखोरांनी दुकान बंद करून दारू पिणाऱ्या ग्राहकांना मारहाण केली आणि त्यांची लूट केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणाचा तपास हवेली पोलीस करीत आहेत.

तीन जण दारूच्या दुकानात दारू पिणाऱ्या व्यक्तींना हॉटेल बंद करून मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवाय हातामध्ये ट्रे, कुऱ्हाडी पाहायला मिळत आहेत. या प्रकरणी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचं दिसून येत आहे. कोयगा गँगची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसून येतेय. कोयता गँगचा सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT