मारहाण Sakal
पुणे

पुण्यात लघुशंकेसाठी गेलेल्या दोघांना लोखंडी हत्यार व स्टम्पने मारहाण

मारहाण करून आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. ही घटना ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : हडपसरमधील पॅराग्लायडिंगमध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या दोघांना लोखंडी हत्यार व स्टम्पने चौघांनी मारहाण करून आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. ही घटना ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. (Pune City Crime News)

कुशल जितेंद्र माळी (वय२२, रा. हांडेवाडी रोड, सातवनगर, हडपसर, मूळ रा. विमाननगर, सुभद्रा निवास, तळोदा, जि. नंदूरबार) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व मित्र हडपसरमधील पॅराग्लायडिंगमध्ये लघुशंकेसाठी गेले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत चार अनोळखींनी लोखंडी हत्यार व स्टम्पने मारहाण करून आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : सहकार्याची नवी दारे होणार खुली; महाराष्ट्र-अमेरिकेतील आयोवा राज्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Nashik News : शिवसेना (ठाकरे)-मनसेचा जनआक्रोश; नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र मोर्चा

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Phulambri Accident : कार-दुचाकीचा अपघात मुलाच्या डोळ्यासमोर बापाने सोडला जीव..! मुलगा थोडक्यात बचावला

SCROLL FOR NEXT