Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : हडपसर, वानवडी परिसरात मटका जुगार अड्डे राजरोसपणे सुरू ; दोन दिवसांत ५१ जण ताब्यात

गुन्हे शाखेकडून छापे, दोन दिवसांत ५१ जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील हडपसर आणि वानवडी परिसरात मटका जुगार अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. परंतु स्थानिक पोलिस ठाण्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने हडपसर आणि वानवडी परिसरात गेल्या दोन दिवसांत जुगार अड्ड्यांवर छापे टाकून ५१ जणांना ताब्यात घेतले आहे.

हडपसर येथील गोसावी वस्ती आणि वानवडी येथील सातवनगर परिसरात मटका आणि जुगार अड्डे सुरू आहेत. याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. तरीही या भागात मटका जुगार अड्डे सुरूच होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या जुगार अड्ड्यांबाबत माहिती मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने सोमवारी (ता. १०) या जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत २८ हजारांची रोकड आणि मोबाइलसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्यात २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तसेच, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पुन्हा मंगळवारी हडपसर येथील मांजरी परिसरात जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३४ जणांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, पोलिस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT