Attack SAKAL
पुणे

Pune : वडकीत तरुणावर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश हा दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने तरुणाला हॉकी स्टीक आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली.

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पूर्ववैमनस्यातून चारजणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना वडकी (ता. हवेली) येथील फिल्म गार्ड कंपनीसमोर बुधवारी सायंकाळी घडली.

या घटनेत ज्ञानेश महादेव म्हात्रे (वय २०, रा. दिवे, ता. पुरंदर) हा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाने फिर्याद दिल्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात प्रणव संतोष निगडे आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश हा दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने तरुणाला हॉकी स्टीक आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच, तरुणावर कोयत्याने वार करून ते पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT