पुणे

Pune Crime : पुणे पोलिसांनी केली शाहरुख खानला अटक ;अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट बनवून नागरिकांची करायचा फसवणूक

सकाळ डिजिटल टीम

शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट बनवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या शाहरुख खानला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला केली राजस्थान मधून अटक केली आहे.

संबंधित आरोपीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या सह देशातील इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाउंट तयार केले होते. याच बरोबर एका पत्रकाराकडून ७० हजार रुपये उकळले होते

अधिक माहिती अशी की, फिर्यादीने सायबर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. यावेळी फिर्यादी यांना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली. राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किमतीत विकत असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपी ने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी ७०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगीतले. फिर्यादी यांनी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्स्फर करुन फर्निचर पाठविले नाही आणि हे सगळं प्रकरण बोगस आहे असे कळताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले.

पोलीसांनी शाहरुकची चौकशी असता आशी माहीती मिळाली की, त्याने देशातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांचे बनावट प्रोफाइल फेसबुक वर बनवून लाखो रुपये उकळले आहेत आधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT