pune crime rejecting insurance claim on concealment of illness Consumer Grievance Redressal Commission  sakal
पुणे

Pune News : आजार लपविल्याचे कारण देत विम्याचा दावा नाकारणे विमा कंपनीला पडले महागात

जयप्रकाश मंडळ यांनी ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ वर ग्राहक आयोगात ऑगस्ट २०२२ मध्ये तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आजार लपविल्याचे कारण देत विम्याचा दावा नाकारणे विमा कंपनीला महागात पडले आहे. कंपनीने चार लाख २२ हजार ५०१ रुपये जून २०२२ पासून सात टक्के व्याजाने विमाधारकाला द्यावे, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी हा निकाल दिला.

याबाबत लोणीकंद येथील जयप्रकाश मंडळ यांनी ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ वर ग्राहक आयोगात ऑगस्ट २०२२ मध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी १४ हजार ४८९ रुपये भरून ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी’चा विमा काढला होता.

त्यात तक्रारदारांसह त्यांची पत्नी, दोन मुले यांचा समावेश होता. विम्यात तक्रारदारांना पाच लाख रुपयांचे संरक्षण देण्यात आले होते. चार मे २०२२ रोजी तक्रारदारांचा कार्यालयातून घरी परतताना अपघात झाला.

या अपघातात तक्रारदारांच्या उजव्या कोपऱ्याला आणि दोन्ही हातांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती. २४ मे २०२२ रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी कंपनीकडे विम्याचा रक्कम मिळण्यासाठी दावा दाखल केला होता.

मात्र तक्रारदारांनी सोरायसिसचा आजार लपविल्याचे कारण देत कंपनीने दावा नाकारला. त्यानंतर तक्रारदारांनी कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क करून पाच जुलै २०२२ रोजी पुन्हा दावा दाखल केला. मात्र, तो दावा देखील कंपनीने नाकारला.

त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करत चार लाख २२ हजार ५०१ रुपये व्याजासह परत मिळावे, अशी मागणी केली होती. याबाबत कंपनीला नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र कंपनीकडून कोणीही हजर न झाल्याने आयोगाने एकतर्फी आदेश दिला.

कंपनीने तक्रारदारांची तक्रार चुकीची आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध करणे गरजेचे होते. परंतु, संधी देवूनही कंपनीकडून कोणी हजर झाले नाही. त्यामुळे तक्रारदार त्यांनी मागणी केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी पात्र आहेत. तसेच नुकसान भरपाईपोटी १० हजार, तक्रारीच्या खर्चापोटी तीन हजार रुपये द्यावे, असे आदेशात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर सुळेंचा कुमावतांना फोन; परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण

Dombivli Politics: 'मोदी भेटीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक'; ठाण्यात भाजप-शिंदे गटात सूक्ष्म सत्तासंघर्ष..

MPSC Result: सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले; ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Shivraj Singh Chouhan : एक-दोन रुपये पीकविमा मिळणं ही थट्टा! अकोल्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल...

आनंदाची बातमी! सोलापुरातील १९ विद्यार्थी झाले सीए; १०८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, राज्यात वाजताेय डंका..

SCROLL FOR NEXT