Crime Esakal
पुणे

Pune Crime: बिबवेवाडीत सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार, दोघांना अटक

Pune Breaking: या मारहाणीत सुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News : दोघा तरुणांनी सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बिबवेवाडीतील रम्यनगरी सोसायटीमध्ये घडली. या घटनेनंतर पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली.

नथू दिनकर सुर्वे (वय ५८, रा. पापळवस्ती, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याबाबत सुर्वे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रतीक सुभाष बिबवे (वय २५, रा. मार्केट यार्ड) आणि क्षितीज विनायक जैनक (वय २१, रा. नवी पेठ) या संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षारक्षक सुर्वे रात्री सोसायटीच्या परिसरात दुकानाजवळ झोपतात. काही दिवसांपूर्वी प्रतीक आणि क्षितीज हे दोघे रम्यनगरी सोसायटीतील मित्रासमवेत बोलत थांबले होते. त्यावेळी सुर्वे यांनी दोघांना हटकले होते.

त्यांनी सोसायटीजवळ गोंधळ घालू नका, असे दोघांना सांगितले होते. त्याचा राग मनात धरून दोघांनी मंगळवारी मध्यरात्री झोपेत असलेल्या सुर्वे यांच्या हातावर आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. या मारहाणीत सुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT