crime news esakal
पुणे

Pune Crime : जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने वार; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्या वादातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. ही घटना कात्रज येथील सुखसागरनगर परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

जुन्या वादातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. ही घटना कात्रज येथील सुखसागरनगर परिसरात घडली.

पुणे - जुन्या वादातून टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. ही घटना कात्रज येथील सुखसागरनगर परिसरात घडली.

अखिलेश ऊर्फ लाडाप्पा कलशेट्टी (वय २२, रा. कात्रज) असे जखमीचे नाव आहे. याबाबत अभिजित सुरेश दुधनीकर (वय २३, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी निखिल गोरख दिनकर (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज) याला अटक केली आहे. तर, अन्य तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिजित आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. याबाबत अभिजितने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर अभिजित आणि त्याचा मित्र अखिलेश हे दोघेजण मंगळवारी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरुन सुखसागरनगर परिसरातून जात होते. त्या वेळी आरोपींनी खंडोबा मंदिराजवळ दोघांना अडवून मारहाण केली. तसेच, अखिलेश याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हत्याराने वार केला. परंतु त्याने तो वार हातावर घेतल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Ayodhya: अयोध्येत सापडला ३०० वर्ष जुना खजिना! हाताने लिहिलेली 'रामचरितमानस'ची दुर्मिळ प्रत समोर; सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

SCROLL FOR NEXT