crime file against dilip khedkar father of pooja khedkar complaint for obstructing government work pune Sakal
पुणे

Pune Crime: भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकावर कोयत्याने वार

Latest Hadapsar News : आरोपींनी निरीक्षकाला कोयता फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

सकाळ वृत्तेसवा

Latest Pune News भांडणे सोडविण्यात मध्यस्थी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकावर सराईत गुन्हेगारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. आरोपींनी निरीक्षकाला कोयता फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) आणि राहुलसिंग ऊर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी केलेल्या हल्ल्यात सहायक निरीक्षक रत्नदीप गायकवाड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली. हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेच्या ठिकाणी दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होता.

त्यावेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडणे करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्यावेळी तेथून निघालेल्या गायकवाड यांनी आरोपींना पाहिले. गायकवाड यांनी तेथे धाव घेत भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न गायकवाड यांनी केला.

झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. आरोपी टाक आणि साथीदार भोंड पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राजा यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी भोंड आणि टाक यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, दंगा करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT