Pune koyata gand  
पुणे

Pune Crime: पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत! वडगाव शेरीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार

Vadgaon Sheri News: कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करून टोळके पसार झाले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: वडगाव शेरी परिसरात टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केल्याची घटना घडली. सत्यम सेरिनेटी सोसायटीजवळ मंगळवारी (ता. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात टोळक्यातील दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी उद्देश विलास शिंगारे (वय २७, रा. माळवाडी, वडगाव शेरी), यश टारगे (वय १९, रा. वडगाव शेरी) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंगारे आणि त्याचे मित्र यश टारगे, विश्वजीत पवार, सिद्धार्थ शेलार, सार्थक धुमाळ आणि लखन पवार हे रात्री गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी चार-पाच दुचाकींवरून आठ ते दहा जण तेथे आले. त्यांनी शिंगारेला ‘विश्व्या कुठे आहे. तू त्याच्याबरोबर का राहतो?’, अशी विचारणा केली.

‘तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत टोळक्याने शिंगारेच्या हाता-पायावर कोयत्याने वार केले. तसेच, टारगेच्या पाठीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करून टोळके पसार झाले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT