3 arrested ihn pune sakal
पुणे

Pune Crime : गडचिरोलीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन तरुणांना अटक

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील कर्मचारी नगर रस्त्यावरील खराडी भागात रविवारी गस्तीवर होते.

सकाळ वृत्तसेवा

Pune - गडचिरोली जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नगर रस्ता परिसरातून रविवारी अटक केली. या तरुणांच्या ताब्यातून ११ लाख ७० हजार रुपयांचा ५६ किलो गांजा जप्त केला आहे.

राम राजेश बैस (वय २०, रा. रामपुरी वॉर्ड, कॅम्प परिसर, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभुर्णे (वय २१, रा. गौराळा, ता. लाखुंदर, जि. भंडारा) आणि निकेश पितांबर अनोले (वय २२, रा. कस्तुरबा वॉर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ मधील कर्मचारी नगर रस्त्यावरील खराडी भागात रविवारी गस्तीवर होते. त्यावेळी गडचिरोलीतील तिघेजण चंदननगर परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार चेतन गायकवाड आणि रवींद्र रोकडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान त्यांच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी ५५ किलो गांजा आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक फौजदार शिवाजी घुले, रवींद्र रोकडे, संतोष देशपांडे, संदीप जाधव महेश साळुंखे, साहिल शेख, नितीन जगदाळे, अझीम शेख, दिनेश बास्टेवाड यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT