Firing Firing
पुणे

वारजे : अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून टोळक्‍याकडून गोळीबार

टोळक्‍याने अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : टोळक्‍याने अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारातुन मुलगा बचावला. याप्रकरणी सहा ते सात जणांविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना वारजे येथे गुरुवारी रात्री साडे आठ वाजता घडली. (Pune Crime News)

याप्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलाने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा व त्याचा मित्र गुरूवारी रात्री साडे नऊ वाजता मित्राकडे वाढदिवसासाठी निघाले होते. वारजे भागातील रामनगर परिसरात त्यांची दुचाकी आली. तेव्हा टोळक्‍याने त्यांना अडविले. दोघांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलावर गोळीबार केला, सुदैवाने गोळी त्याला लागली नाही. मात्र गोळीचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील रहिवासी जमा झाले. टोळक्‍यातील काहीजणांनी रहिवाशांना धमकावले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एम. वाघमारे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT