pune crime update sinhagad road nanded minor girl kidnapped haveli police investigate  sakal
पुणे

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील नांदेड येथून अल्पवयीन मुलीचं अपहरण; गुन्हा दाखल

मूळची उत्तरप्रदेशच्या गाझीपूर येथे राहत असलेली अल्पवयीन मुलगी सिंहगड रस्त्यावरील नांदेडगाव येथे भावाकडे राहण्यास आली

निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावातून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या भावाने याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञाताविरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे अपहरण नेमके कोणी व कोणत्या कारणास्तव केले याबाबत निश्चित माहिती नसली तरी कोणीतरी फूस लावून तिला पळवून नेले असावे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मूळची उत्तरप्रदेशच्या गाझीपूर येथे राहत असलेली अल्पवयीन मुलगी सिंहगड रस्त्यावरील नांदेडगाव येथे भावाकडे राहण्यास आली होती.

भाऊ कामानिमित्त सोलापूर येथे गेल्यानंतर ती घरी एकटीच होती. भाऊ सोलापूर येथून परत आल्यानंतर बहीण घरी नव्हती. त्याने आजूबाजूला मित्र व ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली परंतु ती आढळून आली नाही.

बहीणीचा कोठेच शोध लागत नसल्याने तिला कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले असावे अशी शंका भावाला आली.

हवेली पोलीस ठाण्यात जाऊन त्याने याबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे याबाबत अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT