Pune Crime warje firing case mocca act police action accused arrested  esakal
पुणे

Pune Crime News : वारजे माळवाडीतील आणखी एका टोळीवर मोका

इंगवले याने तीन साथीदारांसोबत मिळून वारजे माळवाडीमध्ये एकावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वारजे माळवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या आणखी एका टोळीतील सराईत गुन्हेगार कार्तिक संजय इंगवले आणि त्याच्या इतर तीन साथीदारांच्याविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर जरब बसविण्यास सुरवात केली असून, त्यांनी मोकांतर्गत केलेली ही सहावी कारवाई आहे. इंगवले याने तीन साथीदारांसोबत मिळून वारजे माळवाडीमध्ये एकावर गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपी कार्तिक संजय इंगवले (वय २० वर्षे, रा. पिठाच्या गिरणीजवळ, रामनगर, वारजे), सनी बाळू शिंदे (वय २१) आणि वैभव दत्तात्रेय भाग्यवंत (वय २४, दोघे रा. बापूजी बुवा चौक, रामनगर, वारजे) या तिघांना अटक केली आहे. ते सध्या येरवडा कारागृहात आहेत. तर, एका अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

आरोपी कार्तिक इंगवले हा टोळी प्रमुख असून, त्याने स्वतःची टोळी तयार करून गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर जबरी चोरी, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान, तोडफोड, बेकायदेशीर पिस्तूल बाळगणे,

नागरिकांच्या मनात दहशत पसरविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी! कॅबिनेट बैठकीत निर्णय; निवडणुकीबाबतही मोठं पाऊल

Sahyadri Trekkers : सह्याद्रीतील लिंगाणा सुळक्यावर ३२ जणांची साहसपूर्ण चढाई; आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात साजरा!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आणि अजित पवार लवकरच एका मंचावर दिसणार

Mohol News : मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहोळच्या तरुण नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे सन्मानित; शहर विकासासाठी निधीची ग्वाही!

Navi Mumbai: नेरूळ स्थानक परिसरात बेवारस वाहनांचा सुळसुळाट, प्रवाशांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT