crime Sakal
पुणे

Pune Crime : मॉडेल कॉलनीत पगारावरून झालेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू

अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पगारावरुन झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत भिडे यांच्या पत्नीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर महादेव जोगळेकर (वय ५८), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२, दोघे रा. मॉडेल कॉलनी), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (रा. कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम,

संतोष ऊर्फ बंटी दत्तात्रेय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांच्यासह अन्य चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिडे हे जोगळेकर यांच्याकडे मशिन ऑपरेटर म्हणून कामास होते. त्यांच्यात पगारावरुन वाद झाला होता. एक सप्टेंबर रोजी आरोपींनी भिडे यांना बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या भिडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT