Murder Sakal
पुणे

किरकोळ कारणातून तरुणाचा खून; पोलिसांकडून एका तासात आरोपीस अटक

तरुणाचा खुन करुन पसार झालेल्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी एक तासातच बेड्या ठोकल्या.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तरुणाचा खुन करुन पसार झालेल्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी एक तासातच बेड्या ठोकल्या. हि घटना सोमवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथे घडली होती. किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातुन खुन (Murder) झाल्याची कबुली आरोपीने दिली. (Pune Crime News)

विशाल ओव्हाळ (वय 26, रा. पद्मावती वसाहत) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शिवदत्त उर्फ दत्तात्रय चंद्रकांत सकट (वय 34, रा. अपर ओटा, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश विठ्ठल ओव्हाळ (वकय 46) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

विशाल ओव्हाळ या तरुणावर सोमवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास महेश सोसायटी येथील राजीव गांधी राजीव गांधी कॉम्प्लेक्‍सच्या पाठीमागील बाजुस अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खुन केल्याबाबतची खबर बिबवेवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर संबंधित तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने पोलिसांनी त्यास उपचारांसाठी तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारांपुर्वीच मृत्यु झाला.

दरम्यान, बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जात होता. मयत विशाल ओव्हाळ हा मोबाईल वापरत नसल्याने पोलिसांना तपासामध्ये अडचण येत होती. पोलिस व विशालचे नातेवाईक आरोपीचा शोध घेत असतानाच, संबंधित गुन्हा शिवदत्त सकट याने केला असून तो सोलापुर जिल्ह्यातील माढा या त्याच्या गावी पळून जाण्यासाठी निघाला असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने विशाल ओव्हाळचा खुन केल्याची कबुली दिली. आरोपी व विशालची सोमवारी सकाळी किरकोळ भांडणे झाली होती. त्या रागातुन आरोपीने त्याचा दगडाने ठेचून खुन केल्याची माहिती पोलिसांना दिली. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलिस कर्मचारी संतोष पाटील, शाम लोहमकर, गणेश दुधाने, दैवत शेडगे, शिवाजी येवले यांच्या पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT