क्रेन चोरी sakal
पुणे

Pune : चारचाकी वाहन चोरी करणार अट्टल गुन्हेगारांस आळेफाटा पोलीसांनी केली अटक

दाखल गुन्हयामध्ये क्रेन चोरीला गेल्याने तसेच आजुबाजुच्या परीसरातून चारचाकी वाहने चोरीला जात

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा : चारचाकी वाहन चोरी करणार अट्टल गुन्हेगारांस आळेफाटा पोलीसांनी केली अटक अट्टल गुन्हेगाराकडून १,४०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत याबाबात आळेफाटा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार येथील नगर रोडवर असलेल्या पसायदान कॉम्प्लेक्स या ठिकाणाहुन दि.९ रोजी रात्रीच्या सुमारास भिमाशंकर सखाराम आवटे यांचे मालकीचे त्यांनी पार्किंग करून ठेवलेले महेंद्रा बोलेरो कंपनीचे केन क्र. एमएच ०४ डीटी ०२८३ हे कोणातरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

दाखल गुन्हयामध्ये क्रेन चोरीला गेल्याने तसेच आजुबाजुच्या परीसरातून चारचाकी वाहने चोरीला जात असल्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पोलीस स्टेशनकडील स्टाफची पथके बनवुन त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या.

त्यानुसार पोलीस पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषन करून व गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळवुन त्यानुसार यातील अज्ञात आरोपींचा माग काढत राजु बाबुराव जावळकर वय ५५वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्टमेट, फ्लॅट नं. ४०३, डोणजेफाटा ता. हवेली जि. पुणे. यांस पुणे या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंघाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देवून सदरचे क्रेन हे अंगद पुनम यादव सध्या रा. कळंबोली, मुंबई, मुळ रा. आझमगड, राज्य उत्तरप्रदेश यांस विकले असल्याचे सांगितले आहे.

तसेच आरोपीने गुन्हयात वापरलेले वाहन स्कॉपिओ वाहन क्र. एम. एच. १६/अ.जी. ४०४४ तसेच सदर गुन्हयातील केन विकलेल्या पोटी आलेले ४०,०००/रूपये असा एकुण १,४०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत करून ती जप्त केली आहे.तसेच या आरोपीवर जवळपास ५०हुन अधिक वाहण चोरीचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुदनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर,पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, विनोद गायकवाड, नरेंद्र गायकवाड, भिमा लॉढे, संजय शिंगाडे, पंकज पारखे, अगित माकुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे, प्रशांत तांगडकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT