पुणे - कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना एकेका बेडसाठी हॉस्पिटलच्या दारात तासन्तास बसावे लागत आहे. पण, त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी जागा मिळत नाही. कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसत असणाऱ्या रुग्णांनी उपचार घ्यायचा तरी कुठे?, असा सवाल आता पुणेकर महापालिका प्रशासनाला विचारत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरात कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही वयोवृद्ध, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा अशा इतर व्याधी असणाऱ्या रुग्णांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. यापैकी कोरोनाची स्पष्ट लक्षणे दिसणाऱ्यांना उपचारांसाठी दाखल करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने दाखल करून घेता येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
धावाधाव अन शोधाशोध
कोरोना विषाणूंच्या संसर्गाचे निदान झाल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. पण, त्यानंतरही हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याचे पुणेकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे एकेका बेडसाठी रुग्णाचे नातेवाईक शहरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी धावाधाव करत आहेत. शक्य त्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बेड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेमकं काय झालंय ?
हॉस्पिटलपुढील समस्या
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.