Pune
Pune sakal
पुणे

Pune: दगडूशेठ गणपती यंदा विसर्जन मिरवणुकीच्या पहिल्याच दिवशी मिरवणुकीत सहभागी होणार; अध्यक्ष माणिक चव्हाण

सकाळ डिजिटल टीम

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीच्या पहिल्याच दिवशी दुपारी ४ वाजता मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचे दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

या ट्रस्टच्या वतीने पुणे शहरातील विविध गणेश मंडळांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना चव्हाण यांनी ही घोषणा केली.

चव्हाण पुढे म्हणाले, "मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे निघत असे. यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत नाही. यासाठी यंदापासून हा बदल करण्यात आला आहे.

लक्ष्मी रस्त्यावरून ही मिरवणूक निघत असे. परंतु, गणपती निघण्यास होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे.

मागील वर्षी दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात गणपतीचे आगमन झाले होते. यामुळे भाविकांना दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले होते. हे टाळण्यासाठी आणि भाविकांच्या भावनांचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF जवान इतकी का संतापली? कुलविंदरच्या नातेवाईकानं सांगितलं

इम्रान खान यांनी दिलं अरविंद केजरीवालांचे उदाहरण; म्हणले, भारतातील सर्वोच्च न्यायालयाने....

Narendra Modi: कुठं होणार नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी? नवी माहिती आली समोर

NEET च्या निकालावर देशात खळबळ! न्यायालयाची एनटीएला नोटीस, काय आहे प्रकरण?

Chandrababu Naidu: एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल, शेअर बाजारातून कमावले 870 कोटी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT