धरण परिसरात पावसाची हजेरी मात्र, पाणीसाठ्यात किंचित वाढ Sakal
पुणे

पुणे : धरण परिसरात पावसाची हजेरी मात्र, पाणीसाठ्यात किंचित वाढ

खडकवासला प्रकल्पात शुक्रवारअखेर २६.२२ टीएमसी साठा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेली तीन दिवस पावसाने हजेरी लावली. परंतु धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. खडकवासला धरणातून सध्या डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग बंद आहे.

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पुणे शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच, जिल्ह्यातील काही तालुक्यांना सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. भीमा खोऱ्यातील सर्व २६ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी (ता. १) जोरदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभरात पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस झाला. खडकवासला प्रकल्पामध्ये गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंत २६.२६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. शुक्रवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत २६.२२ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी ३ डिसेंबरअखेर या प्रकल्पात २७.६८ टीएमसी पाणीसाठा होता. उजनी, कळमोडी आणि चासकमान या तीन धरणांत सध्या शंभर टक्के पाणीसाठा आहे.

प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी

टेमघर ३.५१ (९४.६१)

वरसगाव ११.३८ (८८.७८)

पानशेत १०.४६ (९८.२३)

खडकवासला ०.८७ (४३.८९)

नीरा देवधर ११.७० (९९.७८)

भाटघर २३.३३ (९९.२६)

वीर ७.४६ (७९.२९)

उजनी ५३.५७ (१००)

डिंभे ११.३७ (९१.०१)

कळमोडी १.५१ (१०० )

चासकमान ७.५७ (१००)

भामा आसखेड ६.८० (८८.७२)

पवना ७.४२ (८७.१५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT