Pune Dam Water Level Sakal
पुणे

Pune Dam Water Level : पुणे जिल्ह्यातील धरणसाठ्यात अल्प वाढ; गेल्या दहा दिवसांत वाढले १.७३ टीएमसी पाणी

Pune Weather Update : यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडला. दुसऱ्या आठवड्यात पावसात खंड पडला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : यंदा जूनच्या सुरुवातीपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. सध्या धरणांमध्ये एकूण १४.७३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात १.७३ टीएमसीने वाढ झाली. वाढ होऊनही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा १.३२ टीएमसीने कमी आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडला. दुसऱ्या आठवड्यात पावसात खंड पडला. त्यानंतर आता मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून उपलब्ध असलेले एकूण पाणी ७.४३ टक्के आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेला धरणांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी ८.०९ टक्के इतकी होती. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ०.६६ टक्के इतका पाणीसाठा कमी आहे.

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा १६.०५ टीएमसी होता. सध्याचा पाणीसाठा १४.७३ टीएमसी आहे. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा १.३२ टीएमसीने कमी झाला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याने आता तळ गाठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट आहे.

‘टाटां’च्या धरणांत ७.९८ टीएमसी पाणी जिल्ह्यात टाटा उद्योग समूहाची सहा धरणे आहेत. त्यात मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ४२.७६ टीएमसी आहे. यापैकी सध्या ७.९८ टीएमसी (१८.६७ टक्के) उपयुक्त साठा शिल्लक आहे. या सहापैकी लोणावळा धरणात ०.०१ टीएमसी अल्प साठा उपलब्ध आहे.

प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरण - पाणीसाठा

  • पवना -१.६२

  • चासकमा- ०.५३

  • भामा आसखेड -१.१२

  • आंद्रा -०.७१

  • गुंजवणी -०.३६

  • भाटघर- १.४७

  • नीरा देवघर- १.०६

  • वीर -१.८९

  • माणिकडोह -०.२१

  • येडगाव -०.६४

  • डिंभे- ०.१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT