Musical treat Vasantotsav in Pune
Musical treat Vasantotsav in Pune  
पुणे

पुणे : ‘वसंतोत्सव'च्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी असेल महोत्सव?

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारा ‘वसंतोत्सव’ (Vasantosava) येत्या २० ते २३ जानेवारी, २०२२ दरम्यान रंगणार आहे. महोत्सवाचे हे सलग १५ वे वर्ष असून यंदा स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा रंगमंच येथे हा महोत्सव पार पडणार आहे, अशी माहिती वसंतराव देशपांडे यांचे नातू व प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी दिली. (Pune Dates of Vasantotsav announced need to Know when started festival)

राहुल देशपांडे म्हणाले, "राज्य सरकारने कोरोनासंबंधी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत हा महोत्सव पार पडेल. कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी बापू देशपांडे, नेहा देशपांडे आणि राजस उपाध्ये यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यंदाच्या वसंतोत्सवात शास्त्रीय गायन, तालवाद्य, दाक्षिणात्य व हिंदुस्थानी संगीत याबरोबरच लाईट म्युझिक आणि गझल यांसारख्या वैविध्यपूर्ण संगीत प्रकारांची रेलचेल असेल"

कोण असतील कलाकार?

गुरुवार, २० जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता फरुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध सतार व तबलावादक पं. नयन घोष व त्यांचे सुपुत्र ईशान घोष यांच्या सतार वादनाने व तबला जुगलबंदीने महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर प्रसिद्ध व्हायोलीनवादक पद्मभूषण एल. सुब्रमण्यम आणि त्यांचे सहकारी यांचे व्हायोलीनवादन होईल. शुक्रवार, २१ जानेवारी रोजी सायं ५ वाजता प्रसिद्ध व्हायोलीनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि प्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांची व्हायोलीन व बासरी यांची जुगलबंदी रसिक श्रोत्यांना अनुभविता येईल. जयपूर अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या गायनाने दुस-या दिवसाचा समारोप होईल.

शनिवार, २२ जानेवारी रोजी सायं ४ वाजता महोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी गायक सौरभ काडगांवकर आपले गायन सादर करतील. यानंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा टॉक शो होईल. 'राहुल देशपांडे कलेक्टीव' या लाईट म्युझिकवर आधारित विशेष कार्यक्रमाने या दिवसाची सांगता होईल. यात राहुल देशपांडे, दीप्ती माटे, संजॉय, ओजस अधिये, मिलिंद कुलकर्णी, अनय गाडगीळ, अभिजित बढे आणि मनीष कुलकर्णी आदी कलाकारांचा समावेश असेल. रविवार, २३ जानेवारी महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात सायं ४ वाजता होईल. प्रसिद्ध ढोलकीवादक निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवादनाने महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाला सुरुवात होईल. यानंतर अनुप जलोटा यांचा गझल व सदाबहार गीते यांचा कार्यक्रम होईल. महोत्सवाची सांगता राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT