A police team inspecting the crime spot near Sinhagad College where a 20-year-old youth was brutally attacked in broad daylight.
esakal
Pune youth murder news updates : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये मारहाण, गँगवार, खंडणी वसूली ते खून यासह विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य पुणेकरांना शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न पडतोय. चिंतेचीबाब म्हणजे कॉलेजमध्ये शिकणारी मुलेही या गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपी म्हणून आढळत आहेत.
अशीच एक खळबळजनक घटना पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात घडली आहे. या कॉलेजच्य एका इमारतीजवळ अवघ्या २० वर्षीय तरूणाचा कोयत्याने वार करून आणि कुंड्यांनी मारहाण करून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे कॉलेज परिसर हादरून गेला आहे, तर अन्य विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, खून झालेल्या २० वर्षीय तरूणाचे नाव सय्यद आहे. सय्यदचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून, या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठवला आहे आणि गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. खरंतर काही दिवसांपूर्वीही पुण्यातील कायम वर्दळ असणाऱ्या बाजीराव रस्त्यावरही मयांक खराडे नावाच्या व्यक्तीच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
याशिवाय पुण्यातील येरवडा नगर रोड सरगम पेट्रोल पंप, गुंजन चौक येथे १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी किरकोळ वादातून दोन आरोपींनी कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले होते. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास फिर्यादीला जीव मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू करून अखेर पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना पकडल्याची माहिती समोर आली आहे.