(overhead cables PMC will appoint Private agency for survey sakal
पुणे

पुणे: ओव्हरहेड केबलच्या खुलाशासाठी कंपन्यांना मुदत

ज्या कंपन्या जबाबदारी स्विकारणार नाहीत,त्यावर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ७ हजार ४४०किलोमीटर लांबीच्या बेकायदा ओव्हरहेड केबल्स सापडल्यात. मात्र, संबंधित कंपन्यांनी या केबल्सवर कारवाई करण्यापूर्वी आणखी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. ज्या कंपन्या जबाबदारी स्विकारणार नाहीत, त्यांच्या केबल कापून टाकण्याची कारवाई केली जाणार आहे.

महापालिकेच्या नियमानुसार मोबाईल, इंटरनेट, टीव्ही चॅनेल्स, वीज वाहिनी या भूमिगतच असल्या पाहिजेत. त्या ओव्हरहेड असल्याने शहराचे विद्रूपीकरण होतेच शिवाय महापालिकेचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडतो. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समितीने बेकायदा केबल्स शोधून काढण्यासाठी संस्थेची नियुक्ती केली, या संस्थेने सर्वेक्षण करून पथ विभागाला डिसेंबर २०२१ मध्ये अहवाल सादर केला. यामध्ये जिओ डिजिटल फायबर प्रा. लि. कंपनीची ३ हजार ८९० किलोमीटर, ई व्हीजन टेले इन्फ्रा प्रा. लि. कंपनीची ३ हजार ५५० किलोमीटर लांबीची बेकायदा केबल आढळून आली आहे.

ई व्हीजन टेले इन्फ्रा प्रा. लि. कंपनीने एअरटेलची १ हजार ४५०किलोमीटर, व्होडाफोन-आयडिया कंपनीची ८२५ किलोमीटर आणि टाटा कम्युनिकेशनची १ हजार २७५ किलोमीटर ओव्हरहेड केबल टाकली आहे. महापालिकेने या जिओ आणि ई व्हीजन या दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावून १५ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते.

यातील काही कंपन्यांनी त्यांच्या केबल इतर कंपन्यांना वारण्यासाठी दिल्या आहेत. महापालिकेने थेट करावाई केली तर शहरातील इंटरनेट, टीव्ही, मोबाईलची सेवा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांकडून आणखी आठ दिवसांची मुदत मागितली आहे.

पथ विभागाने भूमिगत केबल्स टाकण्यासाठी खासगी कंपन्यांना प्रति मिटरसाठी १२ हजार १९१ रुपये, एमएनजीएलसाठी ६ हजार रुपये प्रति मिटर. तर वीज कंपन्यांसाठी २ हजार ३५० रुपये प्रति मिटर खोदाई शुल्क निश्‍चीत केले आहे. या साडे सात हजार किलोमीटरच्या ओव्हर हेड बेकायदा केबल्स अधिकृत करून घ्यायचे झाल्यास ९ हजार कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते.

‘‘महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ७ हजार ४४० किलोमीटरची ओव्हरहेड केबल आढळली आहे. त्यासाठी दोन कंपन्यांना नोटीस बजावली होती. काही कंपन्यांनी केबल्सची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे, तर काहींनी मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे या कंपन्यांना आणखी आठ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी जबाबदारी घेतली नाही तर या केबल्स कापून टाकण्यास सुरवात केली जाईल.’’

- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT