mpsc exam 2021.jpg 
पुणे

MPSC: उत्तरतालिकेतून थेट प्रश्न वगळले; न्यायालयात याचिका दाखल

‘एमपीएससी’च्या निर्णयाचा उमेदवारांना फटका; न्यायालयात याचिका दाखल

सकाळ वृत्तसेवा

‘एमपीएससी’च्या निर्णयाचा उमेदवारांना फटका; न्यायालयात याचिका दाखल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) तीन महिन्यांपूर्वी ‘गट-ब’साठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या उत्तरतालिकेतील काही चुकांवर उमेदवारांनी आक्षेप घेतला. मात्र, सुधारित उत्तर देण्याऐवजी एमपीएससीने संबंधित प्रश्नच थेट रद्द केल्याने अनेक उमेदवारांना ०.२५ गुणांनी अनुत्तीर्ण व्हावे लागले. अखेर न्याय मिळविण्यासाठी या उमेदवारांनी न्यायालयात याचिका (court petition) दाखल केली असून त्यावर २० व २३ डिसेंबरला सुनावणी(hearing) होणार आहे, अशी माहिती सूरज पवार या विद्यार्थ्याने दिली.

एमपीएससीने(mpsc) पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, या पदांसाठी राज्य दुय्यम सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेतली. या परीक्षेच्या उत्तरतालिकेतील चुकीच्या उत्तरांवर उमेदवारांनी पुराव्यांसह आक्षेप घेतले होते. मात्र, दुसऱ्याही उत्तरपत्रिकेत अनेक चुका असल्याने एमपीएससीने तिसरी उत्तरतालिका पहिल्यांदाच लावली. त्यामध्ये अचूक उत्तर देण्याऐवजी उत्तरांमध्ये झालेली चूक लपविण्यासाठी एसपीएससीने या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल न करता ते प्रश्नच थेट रद्द केले. एमपीएससीच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका उमेदवारांना बसला असून याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सोमनाथ चव्हाण या उमेदवाराने सांगितले.

उत्तरतालिका जाहीर करण्याची प्रक्रिया

एमपीएससीकडून परीक्षेनंतर पहिली उत्तरतालिका जाहीर केली जाते. यातील उत्तरांवर आक्षेप असतील, तर ते नोंदविण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर आलेल्या आक्षेपांची तज्ज्ञांकडून तपासणी करून एमपीएससी त्यात बदल करते. काही सुधारणा असतील, तर दुसरी सुधारित उत्तरतालिका जाहीर करून अंतिम निकाल जाहीर केला जातो.

या प्रश्नांवर आक्षेप

उत्तरतालिकेतील प्रश्नपत्रिका कोड ‘अ’मधील प्रश्न क्रमांक २७ बद्दल आक्षेप घेतला होता. यामध्ये चार विधाने दिली होती. ‘ड’ पर्यायात ‘गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे’ असे विधान आहे. हे चूक असून पुस्तकातील संदर्भानुसार ‘गौताळा राष्ट्रीय उद्यान नसून ते अभयारण्य आहे. असे एमपीएससीला कळविले होते. मात्र, आक्षेपानंतर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सुधारणा न करता तो थेट रद्द करण्यात आला. असाच गोंधळ प्रश्न क्रमांक १७ मध्येही झाला असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT