corona new varient esakal
पुणे

Pune : पुण्याने शोधला कोरोनाचा नवीन व्हेरियंट! संसर्गक्षमता जास्त असल्याने रुग्णसंख्या वाढीचा धोका

‘एक्सबीबी.१.१६’ची संसर्गक्षमता जास्त असल्याने रुग्णसंख्या वाढीचा धोका

योगिराज प्रभुणे

पुणे : देशात रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढविणाऱ्या कोरोनाच्या ‘एक्सबीबी.१.१६’ हा नवीन व्हेरियंट देशात सर्वप्रथम पुण्याने शोधला. या नवीन व्हेरियंटची संसर्गक्षमता जास्त असल्याने यातून रुग्णसंख्या वाढेल, अशी धोक्याची घंटाही पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने वाजविली होती.

देशात सध्या ‘एक्सबीबी.१.१६’ या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. देशात दररोज नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या १० हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे उपचाराखालील रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण केंद्रीय आरोग्य खात्याने नोंदविले आहे.

राज्यात गेल्या २० दिवसांपासून कोरोना होणाऱ्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमिवर या व्हेरियंटचा शोध घेणाऱ्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.डॉ. कार्यकर्ते म्हणाले, ‘‘विषाणूंमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

विषाणूंच्या स्पाईक प्रोटिनमध्ये किती बदल होतो, त्यातून त्याची संसर्ग क्षमता निश्चित करता येते. देशात सर्वाधिक घातक ठरलेल्या ‘डेल्टा’ या व्हेरियंटला गेल्या वर्षीच्या सुरवातीलाच आलेल्या ओमिक्रॉनने मागे सारले. त्यामुळे डेल्टाचा संसर्ग कमी होऊन ओमिक्रॉनचा वाढला.

त्यातून कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली. या संसर्गामुळे बहुतांश रुग्ण घरातच योग्य औषधोपचार घेऊन बरे झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही. त्याचप्रमाणे आता ‘एक्सबीबी.१.१६’ हा व्हेरियंट आढळत आहे.’’

नाव कसे देतात?

पँगो डेसिगनेशन, नेक्सक्लेड आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) या तीन संस्थांकडून सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे नामकरण करण्यात येत आहे. या तीनही संस्थांची नाव देण्याची प्रक्रिया वेगवेगळी असल्याचे समजते.

पँगो डेसिगनेशन : ही इंग्लंडची नेहेर नावाची लॅब आहे. त्यातून हे नाव देतात. इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे आणि टिंब वापरून हे नाव दिले जाते. त्यात नावाची एक ओळ संपली की, नवीन ओळ सुरू केली जाते.

नेक्सक्लेड : समाजातील किमान ३० टक्के रुग्ण एकाच प्रकारच्या विषाणूंच्या संसर्गामुळे आजारी पडल्यास त्याला इंग्रजी अद्याक्षराप्रमाणे नाव देतात. हे नाव देताना त्यात संबंधित वर्षाचा उल्लेख केला जातो. उदा. पॅगो डेसिगनेशनने नाव दिलेल्या ‘एक्सबीबी.१.५’ याचं ‘२३ ए’ असं नाव नेक्सक्लेड यांनी दिली. कारण, २०२३ मधील ३० टक्के संसर्ग झालेला पहिला म्हणून ‘ए’ हे इंग्रजीतील अक्षर वापरण्यात आले.

कसा बदलला व्हेरियंट?

प्रत्येक वेळी आधीच्या व्हेरियटंशी संबंधित नवीन बदल केलेला व्हेरियंट असतो. तो पूर्ण नवीन विषाणू नसतो. त्यामुळे या संसर्गातून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी असते. मात्र, याला ओमिक्रॉन अपवाद ठरला आहे. कारण डेल्टाची जागा घेणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूंच्या स्पाइक प्रोटिनमध्ये ३० पेक्षा जास्त बदल झाले होते.

त्यामुळे डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग खूप होता. ओमिक्रॉनमधून ‘बीए.१’, ‘बीए.२’ असे नवीन व्हेरियंट पुढे आले. तसेच, ‘बीजे१’ आणि ‘बीएम.१.१.१’ या दोघांचा मिळून एक नवीन व्हेरियंट तयार झाला. यातून ‘एक्सबीबी’ हा नवीन व्हेरियंट झाला. भारतात यातून रुग्ण वाढले.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट शोधण्यासाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. नवीन व्हेरियंटच्या अभ्यासामुळे आरोग्य व्यवस्था सतर्क ठेवण्यास मदत होते. त्यामुळे विषाणूंचा जनुकीय क्रमनिर्धारण आवश्यक आहे, तसेच त्यापुढे जाऊन बदलत्या व्हेरियंटवर उपलब्ध असलेल्यापैकी कोणते औषध प्रभावी ठरेल, याचेही संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे.

- डॉ. संजीव ठाकूर,अधिष्ठाता,बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

SCROLL FOR NEXT