Pune District administration orders to supply petrol and diesel to vehicle for industrial workers 
पुणे

उद्योगांतील कामगारांना दिलासा! लॉकडाऊनमध्ये मिळणार वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल

सकाळवृत्तसेवा

पुणे : उद्योगांत दुचाकी अथवा चारचाकी वरून कामावर जाणाऱया कामगारांना पेट्रोल देण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व पेट्रोल पंपचालकांना दिला आहे. कामगारांचे ओळखपत्र पाहून त्यांना पेट्रोल अथवा डिझेल पुरविण्यास सांगण्यात आले आहे. 

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत लॉकडाउन आहे. या काळात उद्योगांत काम करणाऱया सर्व कामगारांना दुचाकीवरून अथवा त्यांच्या मोटारीतून कामावर जाण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार  कामावर जाण्यास कामगारांनी प्रारंभ केला आहे. परंतु त्यांच्या दुचाकी अथवा चार चाकी वाहनांसाठी काही पंपचालक पेट्रोल अथवा डिझेल देत नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा उद्योग संचलनालयानेही त्या बाबत जिल्हाधिकाऱयांशी संपर्क या कामगारांना इंधन पुरविण्याची विनंती केली होती. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड म्हणाले, कामगारांना कामावर जाण्यासाठी अथवा कामावरून परतताना इंधन लागल्यास ते पुरवावे, असा आदेश शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचव़मधील सर्व पेट्रोल, डिझेल पंपचालकांना देण्यात आला आहे. तसेच पेट्रोल पंप असोसिशएशनलाही या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 

कामगारांचे आेळखपत्र तपासून आणि कामावर जाण्याच्या त्यांच्या वेळा तपासून इंधन देण्यात यावे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पेट्रोल पंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान खुले राहणार आहेत. त्या काळात इंधन मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. 

शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम सुरू असलेल्या उद्योगांची संख्या सुमारे 70 हजारच्या आसपास आहे. त्यात सुमारे 7 लाख कामगार काम  करीत आहेत. मोठ्या कंपन्यांच्या बस आहेत. परंतु, लहान उद्योगांकडे बस नाहीत. त्यांचे कामगार दुचाकी अथवा मोटारीतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी इंधनाची समस्या निर्माण झाली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारामुळे ही समस्या आता दूर झाली आहे.  

दरम्यान, लॉकडाउनच्या दुसऱया दिवशी उद्योग सुरळीत सुरू होते. तसेच कामगारही नेहमीप्रमाणे कामावर जात होते. काही ठिकाणी कामगार अनुपस्थित होते. परंतु, उद्योगांकडून या बाबत काहीही तक्रारी आलेल्या नाहीत. पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील उद्योग सुरू आहेत, असे जिल्हा उद्योग संचलनालयाने स्पष्ट केले आहे.
------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT