Pune District Bank branch manager faces criminal charges for breach of code of conduct Sakal
पुणे

Pune : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हा शाखेच्या व्यवस्थापका विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलय..आत्ता रात्रीचे बारा वाजले तरी बँक सुरू आहे.

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे ( पुणे) : पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलय..आत्ता रात्रीचे बारा वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा ..निवडणूक आयोग दिसतंय ना ?

सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल अशा आशयाची पोस्ट करत त्याखाली पिडीसीसी बँक वेल्हे शाखेचा फोटो आमदार RohitPawar@RRPSpeaks या आयडीवरून प्रसारीत केल्यानंतर याची चौकशी करत बॅंकेच्या सीसीटीव्ही फुटेज आधारे

वेल्हे तालुक्यातील फिरते भरारी पथकाचे पथक प्रमुख रमेश आजिनाथ बेलेकर ,कृषी सहायक वेल्हे कृषी विभाग यांनी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून या प्रकरणी पुणे जिल्हा बँकेच्या वेल्हे शाखेच्या व्यवस्थापकावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

विनायक तेलावडे असे बँक व्यवस्थापकाचे नाव असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार रोहित पवार यांनी ६ मे रोजी रात्री उशिरापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती वेल्हे शाखा बँक सुरू असल्याची पोस्ट केली होती. त्यानुसार आज मंगळवार (ता.७) रोजी सकाळी

वेल्हे तालुक्यातील फिरते भरारी पथकाचे पथक प्रमुख रमेश आजिनाथ बेलेकर ,बॅंकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यानंतर बँकेमध्ये सीसीटीव्ही फुटेज नुसार काल सोमवार (ता.०६) रोजी बॅंकेच्या कार्यालयीन कामाची वेळ संपल्यानंतर बँके मध्ये चाळीस ते पन्नास व्यक्ति संशयास्पद स्थितीत संचालक यांच्या केबिनजवळ ये जा करीत असल्याचे दिसून आले .

बँकेची वेळ संपल्यानंतर विनाकारण रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेऊन लोकसभा निवडणुक २०२४ चे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: गौतम गंभीरचं पद धोक्यात? 'या' अनुभवी खेळाडूला ऑफर; कसोटी संघासाठी BCCIचा ‘प्लॅन B’ तयार!

मिर्झापूर ते रक्तांचल: 'या' सीरिजच्या तीनही सीझनने घातला धुमाकूळ; आता चौथ्या सीझनची उत्सुकता; तुम्ही कुठल्या सीरिजची वाट पाहताय?

Pune News : आता दस्त क्रमांकाच्या आधारे मिळणार कर्ज; नोंदणी ‘ई-प्रमाण’ प्रणालीवर करण्याचा विचार

एक 'विग' ठरलं वादाचं कारण! 'दृश्यम 3' नाकारल्याने निर्माते अक्षय खन्नाला नोटीस पाठवणार, टीका करत म्हणाले, 'यश त्याच्या डोक्यात...'

Water Supply : सूस, म्हाळुंगेचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुळशीतून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला राज्याची तत्त्वतः मान्यता

SCROLL FOR NEXT