BJP 
पुणे

भाजपने महावितरणला दाखवला कंदील; ऑफिसपुढे केली वीज बिलांची होळी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना भरमसाठ रक्कमेची विजेची देयके दिल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हा भाजपच्यावतीने गुरूवारी (ता.२) पुण्यातील रास्ता पेठेतील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कंदील दाखवत विज देयकांची होळी करत महावितरण कंपधीचा निषेध करण्यात आला.

राज्याचे माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर आदींसह जिल्हाभरातून सुमारे १०० पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

राज्यात सध्या लॉकडाउन सुरू आहे. यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती दोलायमान झालेली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा रकमेची विज देयके नागरिकांना दिली आहेत. नेहमीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक रकमेची बिले देण्यात आली आहेत, असा आरोप हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, राहूल कूल, गणेश भेगडे यांनी यावेळी केला. ही वीज देयके तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhairyasheel Mohite-Patil: संकटकाळी सोबत राहिलेल्या तरुणांना संधी देणार: धैर्यशील मोहिते-पाटील; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता संवाद मेळावा

Latest Marathi Live Update News: कांदिवलीत मंत्री उदय सामंत यांची शाखा भेट; महापालिका निवडणुकीची तयारीचा आढावा

VIRAL VIDEO : जेव्हा चालू सीनमध्ये सुबोधला खरोखर कुत्रा चावला ; किस्सा सांगताना तेजश्रीला हसू अनावर

Coconut Water: नारळाचे पाणी थेट पिऊ नका तज्ज्ञांचा सल्ला, जाणून घ्या कारण

Satara Fraud:'नोकरीच्या आमिषाने ३८ लाखांची फसवणूक'; रयत संस्थेमध्ये नोकरीचे आमिष,भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT