PDCC Bank sakal
पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे १४ जण बिनविरोध; ७ जागांसाठी होणार लढत

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी आता सात जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी आता सात जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे.

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) (PDCC Bank) संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी (Election) आता सात जागांसाठी चुरशीची लढत (Fight) होणार आहे. बॅंकेच्या २१ संचालक पदांपैकी गुरुवारी अर्ज माघारीच्या अखरेच्या दिवसापर्यंत १४ जण बिनविरोध झाले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या ४ जानेवारी रोजी होणार आहे.

जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के (हवेली), माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (मुळशी), दिगंबर दुर्गाडे (पुरंदर), आमदार अशोक पवार (शिरूर), पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (हवेली), सुरेश घुले, जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आशा बुचके (जुन्नर) आदी प्रमुख उमेदवारांसह संचालक पदाच्या सात जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी गुरुवारी (ता.२३) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. या मुदतीत दिवसभरात ३४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आजअखेरपर्यंत १४ जण बिनविरोध झाले आहेत. तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघाच्या १३ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्या असून हवेली, मुळशी आणि शिरूर या तीन अ वर्ग मतदारसंघांची निवडणूक लागली आहे. या तीनही मतदारसंघात दुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरूरमधून आमदार अशोक पवार यांच्या विरोधात आबासाहेब गव्हाणे, हवेलीतून बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच विकास दांगट हे निवडणूक रिंगणात आहेत.त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

मुळशी तालुका मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी कॉंगेसचे तरुण उमेदवार सुनील चांदेरे यांच्यात दुरंगी लढतीचा सामना रंगणार आहे. क वर्ग मतदारसंघातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (भाजप) यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले हे निवडणूक लढवत आहेत. ड वर्ग मतदारसंघातून बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक दिगंबर दुर्गाडे यांच्या विरुध दादासाहेब फराटे निवडणूक लढवत आहेत.

महिलांच्या दोन जागांसाठी तिघी जणी रिंगणात

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाच्या दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. या दोन जागांसाठी तीन महिला निवडणूक रिंगणात उरल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन आणि भाजपच्या एका महिलेचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंगेसच्या निर्मला जागडे, पूजा बुट्टे आणि भाजपच्या आशा बुचके या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT