Salon_Beauty_Parlour
Salon_Beauty_Parlour 
पुणे

'... अशी सुरु ठेवता येतील सलून अन् ब्युटी पार्लर'; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून आणि ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विशिष्ट अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. 
शासनाच्या आदेशानुसार केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी व शर्तींच्या अधीन परवानगी दिली आहे.

पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्रात, नगरपंचायत, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, तसेच छावणी परिषद हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रामध्ये केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर चालू ठेवण्यासाठी खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून 28 जून पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत चालू ठेवण्यास जिल्हाधिकारी राम यांनी परवानगी दिली आहे.

केवळ निवडक सेवा जसे की केस कापणे, केसाला रंग देणे, वॅक्सिंग थ्रेडिंग इत्यादीला परवानगी असेल परंतु त्वचेशी संबंधित सेवांना सध्या परवानगी नाही. सदर बाबी दुकानात स्पष्टपणे दर्शविल्या जाव्यात, कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अॅप्रॉन आणि मास्क, सॅनिटायझर इ. चा समावेश असलेले संरक्षक साधने वापरणे आवश्यक आहे.

प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ/निर्जंतूक करणे आवश्यक आहे. तसेच दुकानातील संपूर्ण क्षेत्र आणि जमीन पृष्ठभाग/फरशी प्रत्येक 2 तासांनी स्वच्छ व निर्जंतूक करण्यात यावेत. टॉवेल्स, नॅपकिन्स यांचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावता येईल, अशा प्रकारच्या टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करण्यात यावा. तसेच वापरुन झाल्यावर विल्हेवाट न लावता येण्याजोग्या (उपकरणांचे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करावे.
सेवा देणारा आणि सेवा घेणारा सोडून इतर व्यक्तीमध्ये 3 फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील.

मास्क, रूमाल नाका-तोंडाला झाकून ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्यक आहे. तसेच दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक राहील.
ग्राहकांना केवळ अपॉईंटमेंट घेऊनच येण्यास कळवावे व ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही याची सलून मालकांनी दक्षता घ्यावी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांनी वरिल प्रमाणे घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावण्यात यावी. अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT