corona update sakal
पुणे

Corona Update : पुणे जिल्ह्यात दिवसभरात २४५ नवे कोरोना रुग्ण

दिवसातील एकूण रुग्णांत शहरातील ९२ रुग्णासोबतच पिंपरी चिंचवडमधील ३३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १०३, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा नवे रुग्ण आहेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता. १३) दिवसभरात २४५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याऊलट २७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील ९२ नवीन रुग्ण आहेत. जिल्ह्यातील अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे.

दिवसातील एकूण रुग्णांत शहरातील ९२ रुग्णासोबतच पिंपरी चिंचवडमधील ३३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १०३, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा नवे रुग्ण आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णात जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्वाधिक १०५ जण आहेत. पुणे शहरातील ९६, पिंपरी चिंचवडमधील ३९, नगरपालिका हद्दीतील २५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जण आहेत.

सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात २ हजार ४१ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी १ हजार ११३ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. उर्वरित ९२८ जण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

Honey Singh News: हनी सिंगचा पाय आणखी खोलात? महाराष्ट्र सायबर सेलने काय दिला अल्टिमेटम?

दमदार संवाद, प्रभावी अभिनय; पण एक गोष्ट खटकते! कसा आहे राजकुमार रावचा ‘प्रहार’?

Marathi News Live Updates: ‘स्मार्ट नागरिक’, ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तकांचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हस्ते प्रकाशन

Ankita Bhandari Case: २४ तासांत बेड्या अन् ८८ दिवसांत ५०० पानांचे चार्जशीट; महिला DIG च्या नेतृत्वाखालील SIT तपास ठरला निर्णायक

SCROLL FOR NEXT