Corona Patient Sakal
पुणे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुणे जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक १८ रुग्णांच्या मृत्यू

पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.३) दिवसात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक १८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.३) दिवसात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक १८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) गुरुवारी (Thursday) (ता. ३) दिवसात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील (Third Wave) सर्वाधिक १८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची (Death) नोंद झाली. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील नऊ, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी चार मृत्यू आहेत. नगरपालिका हद्दीत एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात ४ हजार १४९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून,याउलट ८ हजार ८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारी अहवालातून हे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार १४१ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ८४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७११, नगरपालिका हद्दीत १६१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार १३६ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २ हजार ३८३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार २०२, नगरपालिका हद्दीतील २७५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९० जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

Women's World Cup : भारतीय महिला संघाचे गाणं ऐकलंत का? चार वर्षांपूर्वी ठरवलं होतं, जेव्हा वर्ल्ड कप जिंकू तेव्हा... Video Viral

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

Anil Ambani Assets Seized : ईडीची अनिल अंबानींविरोधात सर्वात मोठी कारवाई; मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो कोटींची संपत्ती जप्त

७० पेक्षा जास्त क्रिकेटर अडकले हॉटेलमध्ये, फायनलआधी आयोजकच फरार; गेल, गुप्टिलसह अनेक दिग्गजांचा स्पर्धेत सहभाग

SCROLL FOR NEXT