कोरोना रुग्ण sakal
पुणे

पुणे : सोमवारी दिवसात जिल्ह्यात १५८ नवे कोरोना रुग्ण

हीच संख्या मागील तीन दिवसांपासून सातत्याने अडीचशेहून अधिक झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune District) मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढत असलेली दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या सोमवारी (ता.२७) कमी झाली आहे. सोमवारी दिवसात जिल्ह्यात १५८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हीच संख्या मागील तीन दिवसांपासून सातत्याने अडीचशेहून अधिक झाली होती. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ८० रुग्णांचा समावेश आहे. (Pune District Corona Updates)

दरम्यान, सोमवारी दिवसातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात दिवसात १८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य एका रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा मृत्यू पिंपरी चिंचवडमधील आहे. दिवसात पुणे शहर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ८० रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ३८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २७, नगरपालिका हद्दीतील ८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पुणे शहरातील सर्वाधिक ७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील २५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७०, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण १ हजार ९७९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ४१४ हे गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT