corona update sakal media
पुणे

पुणे : कोरोनामुक्तांच्या तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या दुपटीहून जास्त

मागील चार दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे. यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.३) दिवसभरात कोरोनामुक्तांच्या तुलनेत नवीन कोरोना रुग्णांची संख्या दुपटीहून जास्त झाली आहे. मागील चार दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे. यामुळे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या संख्या वाढीमुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, पण अधिक काळजी घेणे आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Pune District Corona Updates)

सोमवारी दिवसात जिल्ह्यात ७२७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ३३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४४४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये १४९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८७, नगरपालिका हद्दीत ३७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १० नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पिंपरी चिंचवडमधील सर्वाधिक १३३ जण आहेत. पुणे शहरातील १२०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५५, नगरपालिका हद्दीतील १० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४ हजार २०२ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ६७८ जणांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित ३ हजार ५२४ जण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT