student
student 
पुणे

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थिनी बनल्या ‘स्मार्ट गर्ल’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शालेय मुलींचे भावनिक आणि मानसिक सक्षमीकरण, निर्णयक्षमता विकसित करणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून जीवनकौशल्य वाढविण्यास मदत करण्याच्या हेतूने भारतीय जैन संघटना व पुणे जिल्हा शिक्षण विभागाने ‘स्मार्ट गर्ल्स’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

भारतीय जैन संघटनेतर्फे युवती सक्षमीकरणांतर्गत ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्राँग’ उपक्रम गेली तेरा वर्षे राबविला जात आहे. मात्र, २०१७ पासून पुणे जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या सहकार्य मिळाले आहे. आठवी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी एक हजार दोनशे ‘मास्टर ट्रेनर्स’ना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एकेका शाळेतून दोन शिक्षक निवडले जातात. ‘मास्टर ट्रेनर्स’च्या माध्यमातून केंद्रावर महिन्यात सहा हजार शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. या सर्व प्रशिक्षकांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थिनींपर्यंत हा उपक्रम पोचला आहे.

या उपक्रमात शाळांमध्ये दोन दिवसांत कार्यशाळा घेण्यात येते. काही शाळांमध्ये दररोज दीड तासाचा कार्यक्रम घेतला जातो. ‘स्मार्ट गर्ल’ची माहिती ऑडिओ आणि व्हिडिओमधून सांगितली जाते. विद्यार्थिनी आणि पालकांसोबत चर्चा केली जात आहे.  जीवन कसे जगावे, संवाद, आत्मविश्वास, मासिक पाळी, स्वसंरक्षण, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण केली जात असल्याची माहिती संघटनेच्या प्रोग्रॅम डायरेक्‍टर भारती चौहान यांनी दिली.

असे दिले जाते प्रशिक्षण
आत्मजाणीव, आत्मसन्मान आणि स्वसंरक्षण, संवाद आणि नातेसंबंध, निवड आणि निर्णय, मैत्री आणि मोह अशा सहा बाबींवर प्रशिक्षणार्थी ‘ट्रेनर्स’ना प्रशिक्षण दिलेले आहे. विद्यार्थिंनीमध्ये विविध संवेदनशील विषयाबाबत असलेले समज-गैरसमज दूर करण्यात येत आहेत. आठवड्यातून दोनवेळा शाळेच्या दैनंदिनीत हा उपक्रम राबविला जातो. दोन दिवसांत रंजक सादरीकरण, अनेक खेळ व कृतियुक्त लहानलहान सत्रांचे आयोजन, गप्पा आणि गट चर्चासत्र, व्याख्यान, प्रवचन अशा माध्यमांतून कार्यशाळेत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील स्थिती 
 चार हजार शाळांचा सहभाग
 दोन लाख विद्यार्थिनींना प्रशिक्षण
 सहा हजार शिक्षक प्रशिक्षक
 एक हजार दोनशे ‘मास्टर ट्रेनर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT