Pune district Under groundwater level is increased 
पुणे

World Water Day 2021 : पुणे जिल्ह्यात भूजल पातळीत झाली वाढ

योगेश घोडके

पुणे : दिवसेंदिवस खालावत जाणारी भूजल पातळी हा कृषी अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, यंदा जिह्यामध्ये पुरेसा पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यात भूजल पातळी समाधानकारक असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षातील जानेवारीमधील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत व जानेवारी २०२१मधील सरासरी भूजल पातळीमध्ये ०. ८५ मीटरने वाढ झाली आहे. मागील पाच वर्षातील जानेवारीमधील सरासरी भूजल पातळी ४. ०८ मीटर होती. जानेवारी २०२१ मध्ये जिल्ह्यात सरासरी भूजल पातळी ३.२३ मीटर आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. 

भूजल संचय निर्माण होण्यास पर्जन्यमान, भौगोलिक परिस्थिती व भूस्तराची प्रकार हे प्रमुख घटक आवश्यक असून या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामानुसार भूजलाचे पुनर्भरण होते. भूजलाचे पुनर्भरण होण्यासाठी पर्जन्यमान हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेल्या पावसामुळे तेथील भौगोलिक रचना व भूस्तराचा प्रकार यावर आधारित भूजलाचे पुनर्भरण होते. या पुनर्भरणामुळे तयार झालेला भूजल संचय हा भूजलाच्या पातळीमध्ये झालेल्या वाढीद्वारे दिसतो. या भूजलाच्या संचयामध्ये होणारी वाढ किंवा घट भूजल पातळीच्या नोंदीनुसार ठरविण्यात येते. हा अंदाज घेण्यासाठी भौगोलिक परिस्थितीनुसार पाणलोट क्षेत्र हा प्रमुख घटक धरण्यात आलेला आहे. 

Exclusive : लेटरबॉम्ब प्रकरणी चौकशी करण्यास मी पात्र नाही; रिबेरोंचा नकार

''भूजलाचा सर्वाधिक वापर हा शेती सिंचनासाठी केला जातो. शेती सिंचनामध्ये पारंपारिक सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणावर आहे. आधुनिक सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केल्यास भूजलावर येणारा ताण कमी होऊन भूजल साठ्यामध्ये उपलब्धता वाढू शकते. ''
- डॉ. प्रमोद रेड्डी  वरिष्ठ भूवैज्ञानिक  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे. 

जिल्ह्यात १९२ निरीक्षण विहिरी- 

महाराष्ट्र सरकारच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत प्रत्येक पाणलोट क्षेत्रामध्ये निरीक्षण विहिरी स्थापित करून त्या विहिरीतील भूजलपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. जिल्ह्यातील एकूण १९२ निरीक्षण विहिरी स्थापित करण्यात आलेल्या असून पाणलोट क्षेत्रामधील भूजल पातळीचा अंदाज घेण्यासाठी या विहिरीद्वारे भूजलाच्या नोंदी घेतल्या आहेत. 

वर्षातून चार वेळा भूजल नोंदी- 
दर तीन महिन्यांनी पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरीद्वारे भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. म्हणजेच वर्षातून चार वेळा भूजलाच्या नोंदी घेतल्या जातात. 

जगावर कोरोनापेक्षा पाण्याचं संकट मोठं; 2025पर्यंत येईल भयंकर परिस्थिती​

पाणी पातळीत वाढण्यासाठी उपाययोजना 
-मातीचा नाला बांध 
-सिमेंट नाला बांध 
-चर नाला बांध 
-विहिरींच्या माध्यमातून कृत्रीम भूजल पुनर्भरण 
-शोष खड्डे 
-बहुपयोगी शेततळे 
-कृषी वनीकरण 
-भूजल प्रदूषण नियंत्रण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT