Railway
Railway 
पुणे

पुणे विभागात रेल्वेसाठी ११०० कोटी; पुणे-मिरज मार्ग दुहेरीकरणासाठी ५५५ कोटी

सकाळवृत्तसेवा

पुणे - रेल्वेच्या पुणे विभागासाठी केंद्र सरकारने कोणतीही नवी घोषणा केली नसली तरी, सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. हडपसर रेल्‍वे स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला झालेल्या तरतुदीची माहिती मध्य रेल्वेला नुकतीच मिळाली. या पार्श्वभूमीवर पुणे विभागासाठी झालेल्या तरतुदींची माहिती शर्मा यांनी दिली. या अर्थसंकल्पात पुणे विभागात सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्ण व्हावीत, यावर भर देण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांची कामे निधीअभावी रखडणार नाही, अशीही माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘हडपसर रेल्वे स्थानकाचे सुरू असलेले काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. सध्या हे काम सुमारे ३० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी ५५५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील वाहतूक वेगाने पूर्ण होऊ शकेल.’’ विभागीय सहव्यवस्थापक नीलम चंद्रा, सहर्ष वाजपेयी या प्रसंगी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सूत्रसंचालन केले. 

महत्त्वाची कामे व तरतूद

  • पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी ५५५ कोटी 
  • १६ पादचारी उड्डाण पूल आणि १६ भुयारी मार्गांसाठी ३२० कोटी
  • कडेठाण स्थानकाच्या विकासासाठीही ५० लाख 
  • नवे लोहमार्ग उभारण्यासाठी सुमारे ४७ कोटी 
  • जुन्या मार्गांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ५१ कोटी 
  • सिग्नलिंगची कामे करण्यासाठी ३० कोटी
  • प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणासाठी १३ कोटी
  • मालवाहतुकीच्या शेडसाठी ४ कोटी 

लोकल प्रवासासाठी वाट बघा ! 
पुणे-लोणावळा लोकलमध्ये मुंबईच्या धर्तीवर सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास केव्हा करता येणार, अशी विचारणा केली असता रेणू शर्मा यांनी रेल्वे मुख्यालयाकडे बोट दाखविले. प्रवाशांसाठी लोकल उपलब्ध करण्याची आमची तयारी आहे. मात्र, रेल्वे मुख्यालयाकडून याबाबत आदेश आलेले नाहीत. ते आल्यावर प्रवाशांसाठी लोकल खुली केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या मार्गावर सध्या लोकलच्या चार फेऱ्या होत असून त्यातून अत्यावश्यक सेवेतील सरासरी सुमारे ४२५ कर्मचारी रोज प्रवास करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT