Doctor-Clinics 
पुणे

डॉक्टरांनो, खासगी दवाखाने ताबडतोब सुरू करा, नाहीतर...; विभागीय आयुक्तांचा इशारा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देऊनही बहुतांश डॉक्टरांनी अद्याप दवाखाने सुरू केलेले नाहीत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित दवाखाने सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद करण्यात आले असले तरी खासगी दवाखान्यांना यातून सूट देण्यात आली आहे. परंतु खासगी दवाखाने बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या डॉक्टरांचे वय जास्त आहे आणि त्यांना कुठलाही दुर्धर विकार असेल तर त्यांनी क्लिनिक सुरू केले नाही तरी चालेल. मात्र, जे डॉक्टर तंदुरूस्त आहेत ,पण अद्याप दवाखाने सुरू केले नाहीत, ही  गंभीर बाब आहे.

कोवीड व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत, त्यांना सेवा देणे आवश्यक आहे. महापालिकेने बंद रुग्णालयाची माहिती घ्यावी, म्हणजे प्रशासन कार्यवाहीबाबत निर्णय घेईल. कोविडकडे लक्ष देत असताना, अन्य आजाराकडे दुर्लक्ष होता कामा नये, टेलीमेडीसीनच्या माध्यमातून डॉक्टरांनी रुग्णांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Arrested : 'कॅप्टन' खरातचा घाणेरडा चेहरा उघड; महिलांच्या लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ पोलिसांच्या हाती, राजकीय वर्तुळात खळबळ

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT