wedding News esakal
पुणे

Pune: एका लग्नाची दुसरी गोष्ट: घटस्फोटानंतर जाणवला एकटेपणा, आले पुन्हा एकत्र अन्...

जुलै महिन्यात विधिवत लग्न करून त्यांना पुन्हा एकमेकांची कायम साथ देण्याचा निश्चय केला.

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: घटस्फोटानंतर आलेला एकटेपणा, वाढत चाललेले वय आणि संसारातील चांगल्या आठवणी विचारात घेऊन एका जोडप्याने घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पुन्हा लग्न करून संसाराची सेकंड इनिंग सुरू केली आहे. जुलै महिन्यात विधिवत लग्न करून त्यांना पुन्हा एकमेकांची कायम साथ देण्याचा निश्चय केला.

रचना आणि रमेश (काल्पनिक नावं) असे या जोडप्याचे नाव. दोघेही परराज्यातील आहेत. पुण्यात नोकरी करत असताना त्यांची एकमेकांशी ओळख झाली. एकमेकांच्या संपर्कात आल्याने दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१६ मध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांच्या संसार सुरळीत सुरू होता.

मात्र, रमेश यांना असलेले मद्याचे व्यसन आणि त्यातून त्यांनी रचना यांना दिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास यामुळे त्यांच्यात वाद होवू लागले. दरम्यानच्या काळात रमेश यांनी रचना यांचे सोने विकले. वाद विकोपाला गेले. रचना यांनी पती विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल केला. नंतर त्यांनी २०२२ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यांना एकही अपत्य नाही.

घटस्फोट घेतल्यानंतर ते वर्षभर वेगळे राहिले. मात्र, काही कारणाने ते पुन्हा संपर्कात आले. एकमेकांशी बोलू लागले. विभक्त असल्यानंतर आलेला एकटेपणा त्यांना जाणवायला लागला. तसेच त्यांचे वय देखील वाढत होते. त्यामुळे त्यांनी वकिलांशी संपर्क साधला.

घटस्फोटानंतर पुन्हा विवाह करता येत असल्याचा सल्ला त्यांना ॲड. प्रणयकुमार लंजिले यांनी दिला. या सल्ल्याने दोघांनी पुन्हा एकत्रित येण्याचा निर्णय घेतला व जुलै महिन्यात त्यांनी लग्न केले. दोघांना ॲड. लंजिले, ॲड. अनिकेत डांगे आणि ॲड. लक्ष्मण सावंत यांनी मार्गदर्शन केले.

वाद सुरू असताना आणि घटस्फोट झाल्यानंतर हे जोडपे स्वतंत्र राहात होते. त्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवत होता. याच काळात त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात घडलेल्या चांगल्या क्षणांची आठवण देखील झाली. एकमेकांचे वाढते वय, नवीन जोडीदार शोधण्यासाठी करावी लागणारी खटपट, तो चांगला असेल की नाही याची भीती या सर्वांचा विचार करत त्यांनी पूर्वीच्या जोडीदारासोबत राहण्यास पसंती दिली. त्यामुळे ते पुन्हा लग्न करून एकत्र आले.

ॲड. प्रणयकुमार लंजिले, पती-पत्नीचे वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT