crime
crime 
पुणे

पुणेकरांनो, हे वागणं बरं नव्हं...डॉक्टरच्या मुलाला कोरोना झाल्याची अफवा पसरवित मारहाण

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या महिला डॉक्टराच्याच मुलाला कोरोना झाल्याची अफवा पसरवित उच्चभ्रू सोसायटीतील मुलाने लोखंडी सळईने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, मारहाण केलेल्या मुलाच्या वडील व काकाने डॉक्टरांची "गो कोरोना गो" अशी खिल्ली उडवित त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. ही घटना पाषाण परिसरात घडली असून, याप्रकरणी चौघाविरूद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली.

अनिल शिववचन गिरी (वय ४५), अमितकुमार गिरी (वय ४०), सतीश रेगे (वय ६०, सर्व रा. मंत्री ॲव्हेन्यू, पंचवटी सोसायटी, पाषाण रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांसह एका अल्पवयीन मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित महिला डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर महिला या रेडिओलाॅजीस्ट असून, त्या औंध व वाकड येथील रुग्णालयात कार्यरत आहेत. त्या पाषाण येथील मंत्री ॲव्हेन्यू सोसायटीमध्ये राहतात. त्यांचा मुलाने सोसायटीतील त्याच्या एका मित्राकडून काही दिवसांपूर्वी पुस्तके आणली होती. नंतर त्याच्या मित्राच्या आजोबांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयात त्याची तपासणी केली. त्यावेळी संबंधीत डॉक्टरांनी त्याला कोणतीही लक्षणे नसल्याचे व काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यानंतरही फिर्यादी डॉक्टर महिलेने त्यांच्या दोन्ही मुलांना 15 दिवसांसाठी होम क्वारंटाइन केले.

दरम्यान, संबंधीत सोसायटीतील काही रहिवाशांनी फिर्यादी डॉक्टर महिलेचा मुलगा कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची अफवा पसरविण्यास सुरुवात केली. तर, १६ जुन रोजी सोसायटीतील रहिवासी सतीश रेगे याने सर्वांना मेसेज पाठवून कोरोना रुग्णांची माहिती मागवली. त्यानुसार फिर्यादीच्या पतीने रेगे यास फोन केला. त्यावेळी, तुमचा मुलगा कोरोना पाॅझिटिव्ह असून, तुम्ही त्याच्यावर घरीच उपचार करत आहात, असा आरोप केला. तसेच, सोसायटीमध्ये रेगे याने याबाबत अफवा पसरविली.

दरम्यान, सोसायटीतीलच एका अल्पवयीन मुलाने २३ जून रोजी फिर्यादी डॉक्टर महिलेच्या मुलास सोसायटीच्या खाली बोलाविले. त्यानंतर त्याच्याशी भांडणे उकरून काढले व त्याला लोखंडी सळईने मारले. त्यामध्ये सोहम गंभीर जखमी झाला. त्यामुळे कुटुंबीय त्याला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात होते, त्यावेळी अनिल गिरी व अमितकुमार गिरी यांनी, जो डरते है, वो चोर है, गो कोरोना गो... अशी खिल्ली उडवित फिर्यादीच्या दरवाजावर थुंकले. 

दरम्यान, फिर्यादी डॉक्टरांच्या महिलेस रुग्णलयात दाखल केले. त्याला आठ टाके पडले आहेत. मात्र, इतका प्रकार घडल्यानंतरही गुन्हा दाखल असलेल्या व्यक्ती शांत बसल्या नाहीत. त्यांनी, संबंधित डॉक्टरांचा मुलगा कोरोना पेशंट असून त्याच्यावर बहिष्कार घाला, त्यास मारहाण करा, अशी अफवा सोसायटीमध्ये पसरविली. त्यानंतर डॉक्टरांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी फिर्यादी डॉक्टरांनी इंडियन मेडीकल कौन्सिलकडे तक्रार नोंदविली होती. त्याबाबतचे निवेदन डॉ.  उज्ज्वला हाके, डॉ.  अजित गोपछडे, डॉ.  बाळासाहेब हरपळे यांनी चतु:शृंगी पोलिसांना दिले. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई केली. फिर्यादी डॉक्टरांचे सासरे लष्करामध्ये ब्रिगेडीअर होते. फिर्यादी स्वत: डॉक्टर आहेत, त्यांच्या दिराच्या पत्नी वकील आहेत. अशा उच्चशिक्षित कुटुंबास संबंधीत व्यक्तीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Edited By : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT