Pradeep Kurulkar esakal
पुणे

Pune : कुरुलकर प्रकरणात मोठी अपडेट! पॉलिग्राफ अन् व्हॉईस लेअर ॲनॅलिसिस चाचणी...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणात पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणीतील फरक स्पष्ट करा, अशा सूचना विशेष न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दिली आहे. त्यावर पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे.

चाचणी करण्यास परवानगी देण्याची मागणी एटीएसने सोमवारी (ता. २६) न्यायालयात केली. मात्र, व्हाइस लेअर चाचणी म्हणजे नेमके काय, पॉलिग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर चाचणी यात फरक काय, अशी विचारणा न्यायालयाने केली.

त्यावर एटीएसच्या अधिकाऱ्याला दोन्ही चाचण्यांतील फरकाबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने न्यायालयाने सुनावणी घेण्याआधी दोन्ही चाचण्यातील फरक स्पष्ट करण्याची सूचना एटीएसला केली.

पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर यांना चार मे रोजी अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची कोठडी २५ जूनला संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती. दरम्यान, तपासात कुरुलकरांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएस न्यायालयाकडे केली.

त्यासाठीचा अर्ज एटीएसने न्यायालयाला सादर केला होता. सोमवारी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी कुरुलकर यांच्या चाचण्या करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणी म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, यापूर्वी ही चाचणी कोणाची झाली आहे का, अशी विचारणा एटीएसच्या अधिकाऱ्यांकडे केली. डॉ. कुरुलकर यांनी या दोन्ही चाचण्या करण्यास नकार दिला असून, न्यायालयात त्यास विरोध दर्शविणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT