Hostels Sakal
पुणे

पुणे : वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme) आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश (Hostels Admission) घेण्यासाठी अर्ज (Form) करण्यास येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) (CET) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयांतील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. एल. एल. बी., बी. एड. यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेली फेरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. त्याअनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभापासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील ९३ सरकारी वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे. तरी व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील संबंधित मागासवर्गीय मुला-मुलींच्या सरकारी वसतिगृहातून अर्ज प्राप्त करून परिपूर्ण कागदपत्रांसह २८ फेब्रुवारीपर्यंत वसतिगृहात सादर करावेत. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज वितरण आणि स्वीकृती संबंधित जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT