Maharashtra Cabinet  sakal
पुणे

Pune : दोन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळाली २५ वर्षांनंतर नुकसान भरपाई !

मलनिस्सारण विभागातील कर्मचारी नाथा गुलाब कांबळे व महापालिकेत रोजंदारी तत्वावर असणारे रानबा आदिनाथ हावळे हे कर्मचारी २ नोव्हेंबर १९९८ रोजी गुदमरून मृत्यू झाले.

सकाळ वृत्तसेवा

आदित्य आरेकर

Pune - जुन्या बाजाराजवळील शिवाजी स्टेडियमलगतच्या झोपडपट्टीमध्ये सांडपाणी वाहिनीत उतरून काम करताना गुदमरून मृत्यू झालेल्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई महापालिकेने गुरुवारी दिली. तब्बल २५ वर्षांनी ही मदत त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळाली आहे.

शिवाजी स्टेडियम लगतच्या झोपडपट्टी गटारात उतरून सफाई करत असताना मलनिस्सारण विभागातील कर्मचारी नाथा गुलाब कांबळे व महापालिकेत रोजंदारी तत्वावर असणारे रानबा आदिनाथ हावळे हे कर्मचारी २ नोव्हेंबर १९९८ रोजी गुदमरून मृत्यू झाले. नाथा कांबळे यांची पत्नी ज्योती कांबळे यांना महापालिकेने वारसा हक्काने नोकरी दिली होती. तसेच रानबा हावळे यांच्या पत्नी सुनीता हावळे यांचीही आरोग्य खात्यात नेमणूक झाली होती.

परंतु, त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. यासाठी कांबळे आणि हावळे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आणि दोन्ही कुटुंबांना नुकसान भरपाई मिळाली. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील अधीक्षक अभियंता संतोष तांदळे आणि कार्यकारी अभियंता सुनील अहिरे, उपअभियंता किसन दगडखैर यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.

मैला वाहिनी सफाईचे काम करीत असताना आणि १९९३ नंतर मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मधे दिला होता.

त्यानुसार महापालिकेने दोन्ही कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली. धनादेश घेताना दोन्ही कर्मचाऱ्यांच्या पत्नींचे डोळे पाण्याने डबडबले होते. मुलांच्या शिक्षणाठी या रकमेचा उपयोग करण्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT