विघ्नहरने FRP ची रक्कम न देऊन फसवणूक केली : शेतकरी नेते हांडे sakal
पुणे

पुणे : विघ्नहरने FRP ची रक्कम न देऊन फसवणूक केली - शेतकरी नेते हांडे

तसेच वीज निर्मिती, इथेनॉल, बगॅस मोल्यासेस आदी उपत्पादनातून मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात नाही. असा आरोप शेतकरी नेते अंबादास हांडे यांनी केला आहे.

रवींद्र पाटे

नारायणगाव : एफआरपीची एकरकमी रक्कम न देऊन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तसेच वीज निर्मिती, इथेनॉल, बगॅस मोल्यासेस आदी उपत्पादनातून मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात नाही. असा आरोप शेतकरी नेते अंबादास हांडे यांनी केला आहे.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या मनमानी कारभारा बाबत माहिती देण्यासाठी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आज नारायणगाव येथे पत्रकार परिषदेचे अयोजन केले होते. या वेळी हांडे यांनी श्री विघ्नहर साखर कारखाना संचालक मंडळाच्या कारभारावर टीका केली.या वेळी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ, शेतकरी नेते गजानन जगताप, अजित वालझाडे, अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खांडगे, रमेश कोल्हे, नवनाथ भांबीरे आदी उपस्थित होते.

शेतकरी नेते हांडे म्हणाले आंबेगाव तालुक्यातील श्री भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची एक रकमी रक्कम दिली आहे.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची २ हजार ६०४ रुपयांची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी देणे अपेक्षित असताना २ हजार ३०० रुपये दिले आहेत. या मुळे तालुक्यातील सुमारे तीस टक्के ऊस उत्पादक शेतकरी भीमाशंकर साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी देत आहेत.

या मुळे भविष्यात गाळप व प्रशासन खर्च याचा ताळमेळ न बसल्यास विघ्नहर कारखाना अडचणीत येण्याची शक्यता आहे. मागिल वर्षी सुध्दा विघ्नहरने तीन टप्प्यात एफआरपीची रक्कम दिली होती. सभासद शेतकऱ्यांचे विघ्नहरने भागभांडवला पोटी पाच हजार रुपये वसूल करून अहवेलना केली आहे. शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत असताना विघ्नहरने एफआरपीची पूर्ण रक्कम न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वीज निर्मिती, इथेनॉल, बगॅस,मोल्यासेस आदी उपत्पादनातून मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात नाही.

साखर उत्पादना नुसार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली जाते.संचालक मंडळ खोडवा, पूर्व हंगामी लागवड उसाचे नियोजन केले जात नाही.आदी आरोप हांडे यांनी केले आहेत.खोडवा ऊस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विघ्नहरने शेतकऱ्यांना गटनिहाय पंचवीस बुलेट बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.मात्र बुलेटचा खर्च कोण करणार ? संचालक मंडळ त्यांच्या खिशातून करणार का ? या बाबतचा खुलासा विघ्नहरच्या संचालक मंडळाने करावा.असे आवाहन हांडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

Pune Bar Election : पुणे बार निवडणुकीत साडेसात हजार वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यवस्थापनावर नाराजी

Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT