किसान संघाचे आंदोलन sakal
पुणे

पुणे : ‘एफआरपी’साठी किसान संघाचे आंदोलन

उसाला चार हजार रुपये प्रतिटन भाव मिळावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी भारतीय किसान संघातर्फे शहरातील साखर आयुक्त कार्यालयासमोर गुरुवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. उसाला चार हजार रुपये प्रतिटन भाव मिळावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये एफआरपी देण्याची शिफारस कृषिमूल्य आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. राज्य सरकारनेही अशाच स्वरूपाची शिफारस केली आहे. मात्र, त्यामुळे शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात अडकणार असल्याने एकरकमी एफआरपी द्यावे, असे निवेदन साखर आयुक्तांना किसान सभेतर्फे देण्यात आले. आजपर्यंत ज्या लोकांनी शेतकऱ्यांची आंदोलने केली त्यांनी राजकारणाचा मार्ग पत्करून लाभाची पदे पटकावली. त्यामुळे शेतकरी उघड्यावर पडले.

भारतीय किसान संघ अराजकीय संघटना असल्यामुळे हा प्रश्न कोणत्याही तडजोडीशिवाय सुटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे संघाचे नेते चंदनराव पाटील यांनी सांगितले. तर किसान संघाचे राष्ट्रीय नेते मान साया रेड्डी यांनी साखर कारखान्यांचे अर्थशास्त्र उलगडून सांगितले. ॲड. माऊली तुपे, ॲड. सुभाष देशमुख, ॲड. रावसाहेब शहाणे, मदनराव देशपांडे, कपिला मुठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधादरम्यान ECचा मोठा निर्णय; SIRमध्ये वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी, कशी आहे प्रक्रिया?

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

Latest Marathi News Live Update : "आता मला वेदना नाही, तर अभिमान वाटतो" ,कॅप्टन स्मित यांची पंतप्रधान मोदींशी बातचीत

रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट; अंगावर एकही कपडा नाही; फोटोची जोरदार चर्चा

Heart Health: झिरो शुगर ड्रिंक्स हृदयासाठी सुरक्षित आहेत का? जाणून घ्या कार्डिओलॉजिस्टचा महत्वाचा सल्ला!

SCROLL FOR NEXT