Pune University Sakal
पुणे

पुणे : ललित कला केंद्रात आता पाच वर्षाचा अभ्यासक्रम

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सूरू झालेल्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळेल अशी माहिती डॉ. चैतन्य कुंटे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात आता पाच वर्षाचा एम.ए. एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर सूरू झालेल्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळेल. त्याचबरोबर गुरूच्या सानिध्यात अधिक काळ शिकण्याची संधी मिळेल, अशी माहिती विभागाचे प्राध्यापक डॉ. चैतन्य कुंटे यांनी दिली आहे.

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू झाला असून, बारावीनंतर विद्यार्थ्याने चार वर्षाचे शिक्षण घेतल्यास पदवी आणि पुढील एक वर्षे अधिक शिकल्यास पदव्युत्तर शिक्षणाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. मागील वर्षी पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू राहणार आहे, असेही डॉ. कुंटे यांनी सांगितले. यावर्षी ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये ः

  • दोन वर्षासाठी पदविका, चार वर्षासाठी पदवी आणि पाच वर्षासाठी पदव्युत्तर प्रमाणपत्र

  • मल्टीटाईम एन्ट्री आणि एक्झिटची सुविधा

  • चौथ्या वर्षाला प्रस्तुतीकरणातील संशोधन किंवा व्यावसायात कार्यानुभव

  • कलेच्या सादरीकरणाबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर

  • गुरूच्या सानिध्यात दीर्घकाळ शिकण्याची संधी

प्रवेश क्षमता ः

विद्यापीठाच्या नियमित प्रक्रियेद्वारे यंदाचे प्रवेश झाले आहे. संगीत, नृत्य आणि अभिनयासाठी प्रत्येकी १५ अशा एकूण ४५ विद्यार्थ्यांना प्रवेश प्राप्त मिळाला आहे. बारावीनंतर विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रमात समाविष्ट होता येईल.

"ललित कला केंद्र अगदी सुरवातीपासूनच प्रत्यक्ष सादरीकरण आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देत आहे. एम.ए.च्या एकात्मिक अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना मल्टिपल एक्झिट आणि एन्ट्रीची सुविधा मिळणार आहे. तसेच गुरूच्या सानिध्यात दीर्घकाळ शिकण्याचीसंधीही हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे."

- डॉ. चैतन्य कुंटे, प्राध्यापक, ललित कला केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : ऐतिहासिक क्षण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिली वाघीण दाखल; ताडोबातील ‘चंदा’ सह्याद्रीच्या जंगलात झेपावली...

Pune Navale Bridge Accident : 'अधिकारी समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई'; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा स्पष्ट इशारा

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2025

Corn Palak Paneer Rice Recipe: १० मिनिटांच झटपट होणारा 'कॉर्न पालक पनीर भात' वीकेंडला करा ट्राय, घरातील सर्वजण करतील कौतुक

‘टीईटी’मुळे १० हजार शिक्षकांची पदोन्नती थांबली! ‘या’ पदासाठी ‘टीईटी’ बंधनकारक नाही; शिक्षण विभागाने मागविले शासनाकडे मार्गदर्शन, वाचा...

SCROLL FOR NEXT