handicapped  sakal media
पुणे

पुणे : अपंगांना कर सलवत देण्यासाठी पाठपुरावा

अपंगांना मिळकतकरात ५० टक्के सवलत दिली जावी यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने ठराव करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अपंगांना मिळकतकरात ५० टक्के सवलत दिली जावी यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने ठराव करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे.

पुणे - अपंगांना (Handicapped) मिळकतकरात ५० टक्के सवलत (Concession) दिली जावी यासाठी महापालिकेच्या मुख्यसभेने ठराव करून शासनाकडे मान्यतेसाठी (Government Permission) पाठवला आहे. त्यास त्वरित मान्यता मिळावा यासाठी प्रधान सचिवांकडे पत्र पाठवून पाठपुरावा केला आहे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

शहरातील अपंग नागरिकांच्या प्रश्‍नांवर आज (मंगळवारी) मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेतील. यावेळी १४ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गुरुवारी (ता. २३) अपंग संघटनांतर्फे महापालिकेची मुख्यसभा सुरू असताना आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन ही बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत अपंग संघटनांच्या प्रतिनिधींनी मिळकतकरात ५० टक्के सवलत, पथारी नोंदणीसाठी बायोमॅट्रीक नोंदणीचा विषय उपस्थित केला. तसेच अतिक्रमण कारवाई करताना अपंग नागरिकांशी व्यवस्थित वर्तणूक केले जात नाही, नुकसान केले जाते अशी तक्रार काहीजणांनी केली. त्यावर अपंग नागरिकांचा स्टॉल असेल तर महापालिकेच्या पथकाने योग्य पद्धतीने कारवाई करावी, त्यांच्याबद्दल सहानुभूतिपूर्वक विचार करावा अशा सूचना प्रशासनाला महापौरांनी दिल्या.

अपंग नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेत नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याबद्दल तक्रारी असल्याने दुसरा अधिकारी नियुक्त केला जाईल. तसेच प्रत्येक क्षेत्रिक कार्यालयाच्या ठिकाणी अपंग नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एक अधिकारी असेल. त्यांच्या योजनांच्या निधीची माहिती उपलब्ध होईल याची व्यवस्था केली जाईल, असे आश्‍वासन महापौर मोहोळ यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

शाहरुख खानच्या घरी गणपती बसतो पण त्याची पूजा कोण करतं? अभिनेत्याने स्वतः सांगितलं नाव, म्हणाला-

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT