Fertilizer sakal
पुणे

Pune : भेसळयुक्त रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मालकावर व विक्रेत्यावर फसवणुकीचा गुन्हा...

भेसळयुक्त खतामुळे १८० एकर द्राक्ष बागेचे नुकसान...

राजकुमार थाेरात

वालचंदनगर - येथील शेतकऱ्यांना भेसळयुक्त सल्फेट ऑफ पोटॅश (एसओपी)रासायनिक खत विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी खत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मालक व विक्री करणाऱ्या दुकानदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी बोरीमध्ये खते विक्री करणाऱ्या फार्म केअर या दुकानाचे मालक योगेश बाळू शिंदे (रा.बोरी) व खत निर्मिती करणाऱ्या जय किसान बायोकेमफर्ट एलएलपी कंपनीचे मालक रणजित सदाशिव शिंदे (रा. तिरखंडी ता. माळशिरस जि.सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बारामतीमधील एम.आय.डी.सी रणजित सदाशिव शिंदे यांची जय किसान बायोकेमफर्ट एलएलपी ही खते निर्मिती करणारी कंपनी आहे.

या कंपनीमध्ये सल्फेट ऑफ पोटॅश या खताची निर्मिती करण्यात आली होती. याची विक्री बोरीमधील फार्मा केअर या दुकानाचे मालक योगेश शिंदे यांनी बोरीमधील अनेक शेतकऱ्यांना केली होती. शेतकऱ्यांनी एसओपीचा वापर द्राक्ष बागेसाठी केला होता. मात्र सदरचे खतामध्ये भेसळ असल्यामुळे सुमारे १८० एकर क्षेत्रातील

द्राक्ष बागांचे नुकसान होवून शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे.याप्रकरणी पंचायत समिती व कृषी विभागाने ताताडीने भेसळयुक्त खताचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवले होते. सदरचे खतामध्ये तणनाशकाचा अंश तसेच पोटॅशचे प्रमाण कमी असल्यामुळे आढळले होते. याप्रकरणी इंदापूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमर किसन फडतरे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू विनिमय कायदा,रासायनिक खत नियंत्रण कायद्यनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT