डॉक्टरांचा पर्दाफाश  Sakal
पुणे

पुणे : बोगस शस्त्रक्रिया करून नागरीकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश

विमाननगरमधून तीन बोगस डॉक्टरांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोणतीही वैद्यकीय परवानगी व प्रमाणपत्र नसतानाही विमानानगर येथे दवाखाना टाकून तेथे बोगस डॉक्टरांमार्फत नागरीकांवर केशररोपन शस्त्रक्रिया करुन त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा पुणे पोलिसांची गुन्हे शाखा, महापालिका आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन बोगस डॉक्टराना अटक केली.

शाहरुख हैदर शहा ( रा. गणेशनगर, वडगाव शेरी), पंचशिला काशीनाथ रोडगे (रा. रामवाडी, वडगाव शेरी) व चैताली भरत म्हस्के (रा.वडगाव शेरी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.विमाननगर परिसरात लुंकड क्लाइमैक्स या इमारतीमध्ये डॉ.हेअर मैजिका नावाच्या आस्थापनेत कोणतीही परवानगी किंवा प्रमाणपत्र नसतानाही दवाखाना चालविण्यात येत असून तेथे बोगस डॉक्टरांमार्फत नागरिकांवर केशरोपन शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलिस कर्मचारी नागेशसिंग कुंवर यांना मिळाली होती.

त्यानुसार, याबाबत महापालिका बोगस डॉक्टर कारवाई समिती आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. त्यांनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पथक, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी बोगस डॉक्टरांमार्फत नागरिकांवर केशरोपन शस्त्रक्रिया केली जात असल्याचे उघड झाले. तसेच तेथे कोणतीही परवानगी न घेता किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही दवाखाना चालविला जात असल्याचे उघड झाले.

तेथे एच प्रकारातील औषधे व केशरोपन करण्यासाठी आवश्यक उपकरणे आढळली. तेथे असलेल्या शहा, रोडगे व म्हस्के हे नागरिकांना आपण केशरोपन तज्ञ असल्याचे सांगुन नागरीकांची लाखो रूपयांची फसवणुक केल्याके उघड झाले. त्यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडेही कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे आढळले, त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याविरुद्ध फसवणुक, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसाय कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक पोलिस निरिक्षक शोभा क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील,पोलिस कर्मचारी महेंद्र पवार, राजस शेख, संजय आढारी, दत्ता फूलसुंदर, सागर वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT